About Institution

आनंदीबाई कर्वे प्राथमिक शाळा    30-May-2023
Total Views |

 महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची 

आनंदीबाई कर्वे प्राथमिक शाळा
(पार्वतीबाई अध्यापिका विद्यालयाची पुणे जिल्ह्यातील संलग्न सराव पाठशाळा)
 

आनंदीबाई कर्वे उर्फ बाया कर्वे    ( जन्म : १८६५ मृत्यू - २९ नोव्हेंबर १९५० )

शाळेची स्थापना १८ एप्रिल १९३० रोजी झाली.

 अनाथांची माऊली म्हणून ओळखणाऱ्या जाणाऱ्या आनंदीबाई कर्वे.....

भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात त्यांच्या पत्नी सौ. आनंदीबाई उर्फ बाया कर्वे यांनी मोलाची साथ दिली. आनंदीबाई यांचा जन्म ५ जून १८६५ साली रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख गावी झाला. गोदूबाई बाळकृष्ण जोशी हे त्यांचे माहेरचे नाव. वयाच्या ८ व्या वर्षी नातूंशी त्यांचा बालविवाह झाला. लग्न म्हणजे काय हे कळायच्या आतच वैधव्य आले. जिद्दी, करारी व शिकण्याची प्रचंड आवड असणार्‍या गोदूबाईंनी वयाच्या २४ व्या वर्षी पंडीता रमा बाईंच्या 'शारदा सदनात' शिक्षणाचा श्री गणेशा केला. १३ मार्च १८९३ रोजी गोदूबाईंचा पुनर्विवाह महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याशी झाला. विवाहानंतर त्यांचे नाव आनंदीबाई असे ठेवले. १४ जून १८९६ रोजी अण्णांनी अनाथ बालिकाश्रमाची स्थापना पुणे येथे केली. अण्णांच्या स्री शिक्षणाच्या कार्यात बालिकांना सावली देऊन अनेक अनाथांच्या त्या माऊली झाल्या, त्यांना सर्वजण 'बाया' म्हणत असे. पुढे प्लेगच्या साथीने आश्रमाचे स्थलांतर 'हिंगणे' आजचे 'कर्वेनगर' येथे झाले. अण्णा ध्येयवादी होते. त्यामुळे त्यांचे संपूर्ण लक्ष नोकरी, आश्रम यातच असल्याने संसाराचा सारा भार बायांना उचलावा लागला. मुळातच बायांचा स्वभाव काटकसरी असल्यामुळे कोणतीही वस्तू फुकट न घालवण्याचा त्यांचा कटाक्ष असे. लग्न, मुंज यांसारख्या कार्यक्रमात वापरलेल्या अक्षता त्या गोळा करून आणत व स्वच्छ धुवून त्याचा वापर आश्रमातील मुलींसाठी करत. बायांचे संपूर्ण आयुष्य संघर्षमय व कष्टप्रदच होते. त्यांच्या अपार कष्टामुळे त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मुलांना तर उत्तम शिक्षण दिले पण समाजातील अनंत मुलींची ही ती माता होती. "परोपकार करताना मनात स्वार्थ असू नये." हा हेतू त्यांचा कायम असायचा. अश्या या माऊलीला कोटी कोटी प्रणाम.